टीम सिटी टाइम्स लाखनी | अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या गाण्यांचा ‘दंगा’ चित्रपट येत्या १५ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘जी. आर. फिल्म्स’ बँनरखाली राकेश कुमार यांनी ‘दंगा’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
दिग्दर्शक म्हणून रमीझ राजा मुर्तुझा व विशाल पाटील यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. सुमधूर गाण्याला विशाल पाटीलने संगीतबद्ध केले असून गीतलेखन राकेश कुमार यांनी केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवात ‘दंगा’ चित्रपटाला ‘विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राकेश कुमार यांची ‘अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळाच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे.
कथालेखन व गीतलेखनात उपजत कलाकौशल्य लाभलेले राकेश कुमार हे व्यवसायाने होमीओपैथी तज्ञ आहेत. त्यांनी चार वर्षाअगोदर लाखनी शहरात वैदयकीय सेवा पुरवीली आहे.
शिक्षकी पेशा असलेल्या वडीलांच्या पोटी जन्मलेल्या राकेश कुमार यांचे एक उत्तम पटकथा लेखक व गीतकार मराठी चित्रपटसृष्टीत नाव गाजलेले आहे. यामुळे लाखनी तसेच भंडारा जिल्ह्याचे नाव चित्रपटसृष्टीत राकेश कुमार यांच्या रूपाने नोंदले गेले आहे.
राकेश कुमार यांना आधीपासूनच चित्रपटसृष्टीचे आकर्षण होते. कथा व गीतलेखनाचे उपजतच गुण असल्याने राकेश कुमार यांनी चित्रपटसृष्टीत लवकरच आपली ओळख निर्माण केली आहे. ‘दंगा’ चित्रपटाच्या ट्रेलर व गाण्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे. सिनेमाप्रेमींनी ‘दंगा’ चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात अवश्य पाहावा, अशी साद ‘दंगा’ टीमने केली आहे.