टीम सिटी टाइम्स भंडारा | दि.२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ – ११ भंडारा-गोंदिया मतदार संघाचे मतदान दिनांक १९ मार्च २०२४ रोजी पार पडले असून मतमोजणी दिनांक ४ जून २०२४ रोजी पलाडी येथे होणार आहे.
या ४ जून २०२४ रोजी होणाऱ्या मतमोजणीकरीता जिल्ह्यातील नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण देण्यात आले.
मतमोजणीकरीता नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतमोजणी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या शंकांचे निराकरण यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती लीना फलके व जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर यांनी केले.