टीम सिटी टाइम्स लाखनी | तरुणाई मध्ये अंमली पदार्थ सेवन करण्याची सवयी मोठ्या प्रमाणात वाढली असून लाखनी शहराच्या ग्राम सावरी येथे स्मशानभूमी परिसरात दि. 29 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ सेवन करतांना तीस वर्षीय तरुणास पोलिसांनी रांगेगात पकडले. सोनल उत्तम राऊत वय 30 रा. सौंदड ता. सडक अर्जुनी असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
रात्रीच्या सुमारास पोलीस अधिकारी कर्मचारी गस्तीवर असतांना या घटनेतील आरोपी हा ग्राम सावरी येथील स्मशानभूमी परिसरात मातीच्या चिलम मध्ये अंमली पदार्थ (गांजा) भरून सेवन करतानी आढळून आला दरम्यान, पोलिसांनी अंगझडती घेतली असता, एक सिगारेट, मातीची चिलम, व अर्धवट जळालेली भुकटी मिळून आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई संदेश कानतोडे यांच्या फिर्यादीवरून तसेच वैधकीय अहवालनुसार लाखनी पोलिसांत एन.डी.पी.एस कायद्यानुसार कलम 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे हे करीत आहेत.