टीम सिटी टाइम्स भंडारा | मतदार संघातील नाळ ओळखून त्यावर उपाययोजना करणारे तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर जनता दरबाराचे आयोजन करून संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करणारे माजी विधान परिषद सदस्य तथा माजी पालक मंत्री डॉ. परिणय फुके यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेसाठी नामनिर्देशित केल्यामुळे ते साकोली विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून निवडणूक लढणार का ?
असा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण शनिवारी दी.२४ ऑगस्ट लाखनी येथील निवासस्थानी “नाते ऋणानुबंधाचे रक्षाबंधन कार्यक्रम” यात पत्रकारांनी विचारले असता पक्षाने संधी दिल्यास साकोलीतून लढू. असे सांगितल्याने डॉ. परिणय फुके विधानसभा निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे दिसते.
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषद सदस्य तसेच काही कालावधीसाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेले डॉ. परिणय फुके यांना बाहेरील पार्सल म्हणून ठपका ठेवण्यात आला होता. त्यांनी लाखनी येथे स्वतःचे घर तयार करून साकोली तालुक्यातील झाडगाव येथे शेतजमीन खरेदी करून बाहेरची पार्सलचा ठपका पुसून काढला आहे.
ग्रामीण परिसरातील जनतेच्या समस्यांची त्यांना जाण असल्यामुळे वेळीच मार्गी लावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. या शिवाय साकोली मतदार संघात त्यांनी अनेक विकास कामे केली व करीत आहेत. त्यामुळे डॉ. परिणय फुके यांची जिल्ह्यात विकास पुरुष अशी प्रतिमा तयार झाली असून त्यांनी सातत्याने जनसंपर्क ठेवला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवारास साकोली विधानसभा क्षेत्रातून २७ हजार मतांची आघाडी आहे. भरीसभर म्हणून भारतीय जनता पक्षाने डॉ. परिणय फुके यांचे नुकतेच विधान परिषदेसाठी नामनिर्देशित केल्यामुळे ते साकोली विधानसभा क्षेत्रातून लढणार का ? असा मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.
एकीकडे साकोली विधानसभा क्षेत्राचे वर्तमान आमदार नाना पटोले हे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे यामुळे त्यांची सध्या ताकद वाढलेली आहे. हे सत्ताधारी पक्षाच्या ध्यानात आल्याने डॉ. परिणय फुके यांना विधानसभेची उमेदवारी देऊन येत्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याचा पालकमंत्री करून विद्यमान साकोली चे आमदारास ‘सह देण्यासाठी भाजपाची ही खेळी असल्याचा एक मतप्रवाह आहे.
यावरून साकोली विधानसभा मतदार संघातून डॉ. परिणय फुके विधानसभा निवडणूक लढणार का ? असा मतदारांत संभ्रम निर्माण झाला होता. लाखनी येथील निवासस्थानी “नाते ऋणानुबंधाचे रक्षाबंधन कार्यक्रम” यात पत्रकारांनी विचारले असता पक्षाने संधी दिल्यास साकोलीतून लढू. असे सांगितल्याने डॉ. परिणय फुके विधानसभा निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे दिसून येते.