टीम सिटी टाइम्स जवाहरनगर | महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२४ चे पुरस्कार सोहळा सामाजिक न्याय भवन भंडारा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींचे माया टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींकडून स्वागत गीत व शिवरायांच्या जीवनावर आधारित एकच राजा इथे गाजला या गीतावर नृत्य सादर करीत अतिथींचे स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रजलन करून सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. किशोर लांजेवार होते, तर मुंबई बॉलीवूडचे प्रसिद्ध सिने हास्य कलाकार व अभिनेते भारत गणेशपुरे, संविधान बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, महाराष्ट्र इमारत व कामगार कल्याण समितीचे सदस्य मार्तंडराव भेंडारकर, शिवराम गिरीपुंजे, ज्येष्ठ साहित्यिक नाशिक चौरे, शशिकांत भोयर यांच्या हस्ते हा
पुरस्कार वितरण सोहळा पार पडला पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. विदर्भातील विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, सरपंच, उपसरपंच, युवा नेते यांचा अतीथिंच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी हास्य अभिनेते भरत गणेशपुरे यांनी “चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमातील काही विनोदी गप्पा मंचावर करीत उपस्थितांचे मन जिंकले.
आलेल्या महिलांना लपून-छपून व नटून थटून आलेल्या महिला म्हणतच सभागृहात उपस्थितांमध्ये हास्यकल्लोड निर्माण झाला. तसेच पुरुषांची देखील कौतुक करताना डोक्यावर दाढी मिशी पांढरी झाली आहे परंतु ती काळी दिसावी म्हणून डाय लावून आलेले आजचे युवक तरुण म्हणत त्यांची ही थट्टा केली.
यावेळी अँड. किशोर लांजेवार यांनी पत्रकारांनी अन्यायग्रस्तांसाठी आपला लढा तीव्र करावा, अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खरा अंकुश लावण्याचा काम देखील पत्रकारच करू शकतात असे मत मांडले.
तसेच संविधान बचाव संघर्ष समितीचे कार्यध्यक्ष चंद्रशेखर टेंमुर्ने तथा बांधकाम कामगार महामंडळाचे अशासकीय सदस्य मार्तंडराव भेंडारकर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत भोयर यांनी केले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला भंडारा राज्य प्रतिनिधी मदन कमाणे, गोंदिया राज्य प्रतिनिधी मोहन तवाडे, विदर्भ प्रतिनिधी सचिन बन्सोड, गडचिरोली राज्य प्रतिनिधी कैलास बुरांडे, विदर्भ प्रतिनिधी संजय मानकर, नागपूर राज्य प्रतिनिधी छबिलाल गिरीपुंजे, विदर्भ प्रतिनिधी
राजहंस शेंडे, चंद्रपूर जिल्ह्यातील तथा तालुका प्रतिनिधी अमृतलाल चरडे, धर्मेंद्र भुते, रशीद कुरेशी, नम्रता बागडे, विनोद प्रधान, अनिल टेंभुर्णी, अमोल खोब्रागडे, शीतल ठाकरे तथा मोठ्या संख्येत पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.