टाइम्स सिटी टाइम्स लाखनी | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत किन्ही/सोनेखारी तलावाचे गाळ काढणे व शोषखडा कामाचे भूमिपूजन (दि.२१) फेब्रुवारी रोजी पंचायत समिती सभापती प्रणाली विजय सार्वे, पंचायत समिती सदस्य मनीषा हलमारे, सरपंचा वैशाली शेबे, उपसरपंच शैलेश श्यामकुवर सचिव डीएम पोहरकर, रोजगार सेवक सतीश मांढरे ग्रामपंचायत सदस्य जोती इनावते यांच्या हस्ते उपस्थितीत पार पडला.
सदर तलावाचे काम अंदाजित किंमत १४ लक्ष रुपयाचे आहे. १५६ मजूरांना यापासून रोजगार उपलब्ध होणार असून, किन्ही/सोनेखारी ग्रामपंचायतीने मजूर प्रधान कामास सुरुवात केली आहे. या मजूर प्रधान कामावर दारिद्र्य रेषेखालील, गरीब व प्राधान्यक्रम कुटुंबातील मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. असे सामाजिक कार्यकर्ता देवदास शेबे यांनी सांगितले.
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी प्रथम मजूर सुरेश मळकाम, सुमत्रा जगनाडे, युवराज पंधरे, युवराज नागदेवे, , राजकुमार सराटे, उषा श्यामकुवर, श्रावण फूलसुंगे, अर्जुन मळकाम, प्रवीण धांडे, दया हुमने, सुषमा सपाटे संगणक परिचालक विजेंद्र फुलसुंगे यांच्यासह गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.