सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | लहान भाऊ व मित्रासह मृतक २ दुचाकीने गणेशपुर येथून सासूचे घरून ११:३० वाजताचे दरम्यान जात असताना जुन्या भांडणातून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मृतकास अश्लील शिवीगाळ , दगड विटांनी मारहाण करून हनुवटी व पोटावर धारदार चाकूने मारून खून केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून ५ आरोपींना १२ तासात अटक केली २ आरोपी फरार आहेत .
गणेशपुर-भंडारा येथील घटना
मृतकाचे नाव अभिषेक सावन कटकवार (२१) रा. मेंढा /पोहरा तालुका लाखनी तर आरोपींची नावे १) चिराग नमूद गजभिये (२७) , २) श्याम सुकराम उके(३४), ३) सागर देवानंद भुरे(२५) सर्व राहणार रमाबाई आंबेडकर वार्ड भंडारा ,४) पराग परसराम सुखदेवे (४७) शिक्षक कॉलनी भंडारा , ५) लूकेश उर्फ लुक्का संजय जोध (२५) आंबेडकर वार्ड भंडारा,६) मोन्या उर्फ मोनार शेंडे ,७) तेजस सुनील घोडीचोर दोघेही रा. गणेशपुर भंडारा अशी आहेत .
काही दिवसापूर्वी यातील मृतकाची सासू व पत्नी आणि आरोपी चिरागसोबत भ्रमणध्वनीवरून मॅसेजेस केल्यामुळे मृतक अभिषेकने त्याला हटकल्यामुळे तोंडी वादविवाद झाला होता . सोमवारी (ता २१) ११ ते ११:३० वाजता दरम्यान मृतक त्याचा लहान भाऊ अरमान ३ मित्रासह गणेशपुर येथून सासूचे घरून २ दुचाकीने जात असताना आरोपितांनी एकत्र येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून मृतकास अश्लील शिवीगाळ करून नालीवरील सिमेंटचे दगड, विटांनी मृतकाचे डोक्यावर मारहाण केली.
तसेच धारदार चाकूने हनुवटी व पोटावर वार करून खून केल्याचे लहान भाऊ अरमान कटकवार यांचे फिर्यादीवरून भंडारा पोलिसांनी अपराध क्रमांक ५६५ /२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अशोक बाबुल यांना घटनेची माहिती देऊन त्याचे मार्गदर्शनात तपास सुरू केला.
भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ५ आरोपी गजाआड २ फरार
आरोपी गुन्हा करून पसार झाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून माहितगार सूत्रांचे माध्यमातून प्रयत्न करून अवघ्या १२ तासात मुख्य आरोपीसह ५ आरोपींना शोधून ताब्यात घेण्यात आले. उर्वरित २ फरार आरोपींचा भंडारा पोलिस शोध घेत आहेत.
कलम ३०२, १४३, १४६,१४७, १४८, १४९, २९४ भादवी तथा भारतीय हत्यार कायदा सहकलम ४/२५ अन्वये पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी तपास करीत असून तपास पथकात पोलीस हवालदार शहारे ,
भोंगाडे यांचा समावेश असून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गिरी , अशोक जायभाये , पोलिस उपनिरीक्षक मंगेश कराडे , पोलिस हवालदार वाघमारे , पोलिस अंमलदार झलके, लांडगे , पोलिस नायक कुकडे यांनी आरोपी पकडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.