टीम सिटी टाईम्स मुंबई | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही.
२४.१ षटकांनंतर पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला. यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही. या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. अशा स्थितीत हा सामना आज पूर्ण होणार आहे.
दुपारी ४.४० वाजता सामना सुरू झाला. भारताने २४.१ षटकांपासून खेळण्यास सुरुवात केली आणि निर्धारित ५० षटकांत ३५६ धावा केल्या. विराट आणि राहुलने शतकी खेळी केली.
भारतीय संघाने पहिला रिव्ह्यू गमावला आहे. सिराजच्या चेंडूवर फखर जमानविरुद्ध एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील होते. अंपायरने आऊट न दिल्याने भारतीय संघाने रिव्ह्यूची मागणी केली. चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पडल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. यासह भारताने पहिला रिव्ह्यू गमावला. आठ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या ३०/१ आहे.