Chandrayaan-3: जोहान्सबर्ग | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) मोहीम चांद्रयान-३ बुधवारी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरली. यासह भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले वाहन उतरवणारा जगातील पहिला देश ठरला आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या अंतराळ मोहिमेवर खिळल्या होत्या.
हेही वाचा | आदिवासी उमेदवारांनी कर्जयोजनेसाठी अर्ज करावेत
Chandrayaan-3: पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून हे मिशन लाईव्ह पाहत होते. १५ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान जोहान्सबर्ग येथे आहेत. तेथून लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे ते हा क्षण पाहत होते. इस्रोच्या यशाबद्दल ते म्हणाले की हा विकसित भारताचा क्षण आहे.
प्रधानमंत्री म्हणाले की, प्रत्येक देशवासीयांप्रमाणे माझेही लक्ष चंद्रयान ३ महाअभियानावर केंद्रित आहे. मी माझ्या देशबांधवांशी आणि माझ्या कुटुंबियांशीही या उत्साहाशी जोडलेला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे जिथे आजपर्यंत कोणताही देश पोहोचला नाही. आजपासून चंद्राशी संबंधित अनेक समज-गैरसमज बदलतील.
आज आपण अंतराळात आधुनिक भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार आहोत. प्रत्येक घरात उत्सव सुरू झाला आहे. माझ्या मनापासून मी माझ्या देशवासीयांशी व माझ्या कुटुंबियांशी या आनंदात सहभागी आहे.
हेही वाचा | AISF च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन
मी Chandrayaan-3: चांद्रयान टीम, इस्रो आणि देशातील सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांनी या क्षणासाठी वर्षानुवर्षे खूप कष्ट केले. आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, जिथे आजपर्यंत जगातील कोणताही देश पोहोचू शकलेला नाही.
आजपासून चंद्राशी संबंधीत म्हणीही नवीन पिढीसाठी बदलतील. भारतात आपण सर्व पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो. एके काळी चंदा मामा दुर आहे असे म्हटले जायचे. आता एक दिवस असाही येईल जेव्हा मुलं म्हणतील मी आता चंदा मामाच्या दौऱ्यावर आहे
हेही वाचा | शाळेतील चार विदयार्थीनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक
हेही वाचा | अज्ञात चोरांकडून घरासमोर बांधलेल्या म्हशींची चोरी मुंडीपार/सडक येथील घटना