कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याची केंद्रांची राज्यांना सूचना
टीम सिटी टाइम्स भंडारा | राज्यात संक्रमण बचावासाठी सक्ती बाबत निर्णय घेत काही जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना व अमलबजावणी सुरू झाली आहे. केंद्राच्या सूचनेनुसार राज्य सरकारने पुन्हा कठोर उपाय योजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत कोरोनाच्या नव्या विषाणूचा राज्यात प्रसार होत असल्याने निर्बंध लागू करायचे धोरण अमलात आणण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे मूकपट्टीची पुन्हा सक्ती करायची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीच्या वापर लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला होता. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्ण वाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी तज्ञ सह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
कोरोनाची सात अद्याप संपलेली नाही त्यामुळे रुग्ण संख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनावर भर घालायला हवा नदीच्या ठिकाणी मूकपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणांसाठी प्रयत्नशील राहावे असे मंडळी यांनी सांगितले होते.
जास्तीत जास्त कोरोना रुग्णांचे नमुने जनुक्रिय क्रम निर्धारणासाठी पाठविण्याची सूचनाही आरोग्य मंत्री यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली असल्याची माहिती आहे. काही जिल्ह्यात सक्तीचे धोरण बाबतीत सूचना केल्या गेल्या आहेत सध्या भंडारा जिल्ह्यात रुग्णाचा आकडा नसला तरी मात्र पुन्हा एकदा जनतेने सतर्क राहून वर्दळीच्या ठिकाणी सोशल डीस्टगसिंग ठेवून मास्क चा वापर करन्याची वेळ राज्यावर उदभवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.