टीम सिटी टाइम्स मुंबई | महीला आरक्षणाच्या मुद्दयांवरून काँग्रेसचे वायानाडचे खासदार राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. पत्रकार परीषदेला संबोधीत करताना ते म्हणाले की , सरकार महीला आरक्षण बील तत्काळ लागू करू शकते परंतु ते तसे करणार नाही.
हेही वाचा | एमपीडीए कायद्यान्वये (चंगू मंगू) धम्मराज मेश्राम स्थानबध्द : भंडारा पोलीस प्रशासनाची कारवाई
महीला आरक्षण कायदा लागू करण्यासाठी अगोदर जातीय जनगणना करावी लागेल. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना करावी लागेल या सर्व प्रक्रीयेला खूप वेळ लागेल. सरकारने लोकसभेत पास केलेले महीला आरक्षण विधेयक हे दहा वर्षानंतर लागू होईल असे म्हटले जाते परंतु सरकार ते करणार की नाही याबाबतही शंका असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसच्या कार्यकाळात महीला आरक्षण विधेयक लागू झाले नाही याबद्दल खासदार राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला. तसेच भाजप सरकारने पास केलेले महीला आरक्षण विधेयक जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले.
सरकारने सगळ्यांत आधी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी जेणेकरून ओबीसींची संख्या किती आहे हे कळेल. त्यावरून ओबीसींना प्रतिनिधित्व देता येईल असे राहुल गांधी म्हणाले. देशातील सगळ्यांत महत्वाच्या ९० अधिकाऱ्यांमध्ये फक्त तीनच ओबीसी का ?
असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारपुढे उपस्थित केला. ते म्हणाले की , जिथे ओबीसींनाच त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळत नाही तिथे मागासवर्गीय व आदिवासींना प्रतिनिधित्व मिळणे कठीणच आहे.