टीम सिटी टाइम्स लाखनी | सार्वजनिक गणपती विसरजनाच्या मिरवणूकीत क्षुल्लक कारणाहून वीट फेकून मारल्याने एका महिलेला जखमी केल्याची घटना (दि 17) सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास गडेगाव येथे उघडकीस आली आहे. यशवंत हरी बारस्कर (वय 64) रा. गडेगाव यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजेश कुथे (रा. गडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
गडेगाव येथे सार्वजनिक गणपती विसरजनाची मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान, आरोपी राजेश कुथे याने चौकात डिजे कशाला वाजवता असे बोलून अंगणातील विटेचा तुकडा फेकून मारले. यात यशवंत बारस्कर यांच्या उजव्या खांद्याला मार लागला. तर शेजारी उभे असलेल्या कांता कुंभरे यांना देखील डोक्याला मार लागून जखमी केले.
याप्रकरणी, यशवंत बारस्कर यांच्या फिर्यादीवरून तसेच वैदकीय अहवालवरून लाखनी पोलिसांत कलम 125. 125, (अ) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रामकृष्ण बावनकुळे हे करीत आहेत.