सिटी टाइम्स ऑनलाईन लाखनी | समोर जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने मागे असलेली बोलेरो ट्रकला धडकल्याने इसम गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळगाव / सडक पटाची टोली येथे (ता २०) दुपारी ४ वाजता दरम्यान घडली.
जखमीचे नाव चंचल उर्फ चेतन पुरुषोत्तम चांदपुरकर (३७) रा. खात रोड, केसलवाडा, तालुका भंडारा असे आहे . लाखनी पोलिसांनी हयगईने व लापरवाहिने ट्रक चालविल्या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
हेही वाचा | निम्यापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त
ट्रक चालकावर गुन्हा दाखल
बोलेरो पीकअप गाडी क्रमांक एम एच ३६ ए ए ३१६८ चा चालक परसराम कागदे, गाडी मालक चेतन चांदपुरकर सह येरला (राजनांदगाव ) येथून बोलेरो गाडीने काकरेल कोंबड्या घेऊन येत असताना पिंपळगाव/सडक टोली येथे राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक ५३ वर समोर जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ३८ डब्ल्यू ०९६७ चे चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हयगईने चालवून अचानक ब्रेक मारल्याने बोलेरो ट्रकला धडकली व गाडीचे संतुलन बिघडून गाडी रस्त्याखाली उतरली. त्यात चंचल उर्फ चेतन चांदपुरकर याचे डोके ,चेहरा व हातापायाला गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा | सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम निम्न प्रतीचे
उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालावरून तथा चालक परसराम कागदे याचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी ट्रक
चालकाविरुद्ध अपराध क्रमांक ३१५/२०२३ कलम २७९,३३८ भादवी तथा मोटार वाहन कायदा सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत.
हेही वाचा | लाखनी येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार समारंभ