स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या संवैधानिक मूल्यांचा विसर पडून मनुस्मृतीच्या आधारे वर्चस्ववादी राष्ट्र उभारण्यासाठी सत्तेत असलेल्या भाजपला या देशात हिंदुराष्ट्र नको तर मनुस्मृतीचे राज्य हवे आहे. त्यांचा हा उपक्रम सुरू आहे.
या सत्ताधाऱ्यांच्या हाती सत्ता गेल्यास आगामी लोकसभा निवडणूक अंतिम होऊन थेट सत्तांतर सुरू होईल. आता सत्ता परिवर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही असे स्पष्ट संकेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी ” हिंदु राष्ट्र संकल्पना व भारतीय संविधान ” या विषयावर आयोजित व्याख्यानात दिले. वर्धा येथील स्थानिक लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय लोकशाही अभियानातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या व्याख्यानात श्याम मानव म्हणाले की, लोकशाहीचे चारही स्तंभ झटकून देशात विषमता निर्माण करणारी चातुर्वण्य शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. देशात बहुसंख्य हिंदू असूनही हिंदु राष्ट्र घडवण्याचे बेगडी प्रयत्न सुरू आहेत.
भविष्यात मनुवादी भाजप सरकार सत्तेवर आले तर लोकशाही मार्गाने निवडणुका होणार नाहीत. आता त्याची तयारी सुरू झाली आहे. मोकळ्या हवेत श्वास घ्यायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत सर्व सामाजिक विचार प्रवाह आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन सत्ता परिवर्तन घडवून आणले पाहिजे.