टीम सिटी टाइम्स लाखनी | गडेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक(५३ वर रस्त्याच्या बाजूला ठेवलेली सीबी शाईन काळ्या रंगाची मोटारसायकल चोरटयाने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहिती नुसार फिर्यादी राजु तिमा बुराडे वय (४३) वर्षे रा. ठवरे नगर मुरमाडी ता. लाखनी यांनी आपली सीबी शाईन काळ्या रंगाची दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी स्वमालकीची मोटारसायकल क्र.एम.एच. ३५ एके-६१३७ ही गडेगाव येथे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला उभी केली व कबड्डीचे सामने पाहायला गेला.
हेही वाचा | माँजाच्या धाग्याने मोटासाइकलस्वार जखमी !
कबड्डी सामना पाहून आल्यानंतर त्याला त्याची मोटरसायकल नियोजित ठिकाणी दिसली नाही. बराच वेळ वाट पाहूनही मोटरसायकलचा पत्ता लागत नसल्यामुळे त्याने दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार लाखनी पोलिस स्टेशनला दिली.
फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून दि.२९ डिसेंबर रोजी अज्ञात इसमाविरूद्ध लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अपराध क्रमांक ४२३/ २०२३ कलम ३७९ भांदवी अन्वये पोलीस निरीक्षक सत्यविर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलिस हवालदार रामकृष्ण बावनकुळे करीत आहेत.