टीम सिटी टाइम्स लाखनी : तालुक्यातील परसोडी येथील प्रसिद्ध बाईक रायडर मंथन पटले विवाह बेडीत अडकला आहे.उत्तराखंड राज्यातील देवभूमी रुद्रप्रयाग येथिल त्रियुगी नारायण प्राचीन मंदीरात १६ फेब्रुवारीला सकाळी ११:३० वाजता हा विवाह सोहळा संपन्न झाला.तिन युगापुर्वी देवांचे देव महादेव आणि माता पारबतीचा या ठिकाणी विवाह झाल्याची अख्यायिका पुरातन काळापासुन प्रचलित आहे.त्या पावन देवभूमीत मंथनचा विवाह पार पडला
आजही त्या ठिकाणी ज्या विवाह कुंडाला साक्षी मानून भगवान शंकर व माता पारबतीने विवाह केला होता,त्या कुंडाच्या ज्वाला जळत आहेत.त्या ठिकाणी बाईक रायडर मंथन आणि त्याची जीवनसंगिनी प्रियंका यांनी विवाह कुंडाचे सात फेरे घेऊन वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे मंथन पटले यांनी दोनदा स्वतः बाईकने रायडिंग करून संपूर्ण भारत भ्रमण केले आहे .
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २०२१ मध्ये भारत भ्रमणकरीता संपुर्ण देशातून ७५ बाईक रायडरची निवड करण्यात आली होती.त्यात भंडारा जिल्ह्यातून एकमेव मंथन पटले यांची निवड करण्यात आली होती.मंथन पटले हे मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन मध्ये’गोल्ड मेडलिस्ट’ आहेत.लाखनी तालुक्यातील परसोडी गावचे उपसरपंच मनोज पटले व माया पटले यांचे ते चिरंजीव आहेत. शनिवार २२ फेब्रुवारीला परसोडी/केसलवाडा येथे या दाम्पत्याचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
बाईक रायडर मंथन पटले विवाह बंधनात अडकला
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग देवभूमीत बांधल्या रेशीमगाठी
