टीम सिटी टाइम्स भंडारा | भंडारा विधानसभेच्या कुर्झा, इटगाव, बामणी व गोसेच्या क्षेत्रात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या गटाच्या सरपंच, माजी सरपंचासह पक्षाच्या अन्य शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयात या कार्यकर्त्यांना भगवा दुपट्टा घालून प्रवेश करण्यात आला.
नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा पवनी विधानसभेच्या प्रत्येक क्षेत्रात विकास कार्यांचा सपाटा लावित कोट्यवधीचा निधी आणला आणि घोषित केलेले कार्य प्रारंभ सुद्धा केले. या कार्यांना बघता त्यांच्या नेतृत्वावर विश्वासही वाढत जात आहे.
अश्यात विविध गावातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात भर पडली असून कुर्झा, इटगाव, बामणी व गोसे येथील उबाठा गटाच्या शंभरून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कुर्झा गावातील सरपंच पंकज रघुते, माजी सरपंच संजू काले, उबाठा चे युवा सेना तालुका प्रमुख चेतन शहारे व अन्य पदक्षिकाऱ्यांसह कुर्झा, इटगाव, बामणी व गोसे येथील शंभरहून अधिक कार्यकर्ता भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले.भोंडेकर यांनी शिवसेनेचे दुपट्टे घालून त्यांना पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुरवे, शहर प्रमुख मनोज साकुरे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.