टीम सिटी टाइम्स नागपूर | भीम आर्मी भारत एकता मिशन व आझाद समाज पार्टी कांशीराम चे संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह , राष्ट्रीय महासचिव भाई अशोक कांबळे व महाराष्ट्र प्रभारी अनिल भाई धेनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ” सामाजिक न्याय यात्रेला ” दि ९ ऑक्टोबर २०२४ रोजी नागपूर येथून सुरुवात होणार आहे. नागपूर ते चैत्यभूमी असा सामाजिक न्याय यात्रेचा प्रवास राहणार आहे.
यासंबंधीची सूचना महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, कोकण व पूर्व – पश्चिम विदर्भातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना देण्यात आली आहे. समाजिक न्यायाचे पुरस्कर्ते महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज व डाँ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या समतावादी विचारसरणीने प्रेरित होवून वंचित व तळागाळातील समूहाला न्याय मिळावा यासाठी भाई विनय रतन सिंह यांच्या नेतृत्वात भीम आर्मी भारत एकता मिशन हा समाजक्रांतीचा लढा लढणार आहे.
मान्यवर कांशीरामजी यांनी सुरु केलेल्या सत्ता परिवर्तनाच्या लढ्याला बळ देण्यासाठी ही सामाजिक न्याय यात्रा मोलाची ठरणार आहे. भांडवलवादी व्यवस्थेला नेस्तनाबूत करून लोकशाहीचे राज्य पुन्हा प्रस्थापीत करण्यासाठी ही सामाजिक न्याय यात्रा प्रभावी ठरणार आहे.
बहुजन महापुरुषांच्या सन्मानार्थ सामाजिक आंदोलनाला गतिमान करण्यासाठी या सामाजिक न्याययात्रेत बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.