टीम सिटी टाइम्स लाखनी | तालुक्यातील ग्राम गडेगाव येथे दि. २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बौद्ध समाजाच्या वृद्ध दाम्पत्यावर घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने घरात घुसून मारहाण केली होती. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गंभीर दखल न घेतल्याने पिडीत कुटुंबाने दि. १५ जून रोजी भीम आर्मी संघटन भंडारा जिल्हा यांचेकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली होती.
भीम आर्मीच्या पदाधिकारींनी पिडीत कुटुंबाची व्यथा जाणून व झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून दि. १५ जून रोजी दुपारी १ वाजता लाखनी पोलिस स्टेशन गाठले व उपस्तित पोलिस उपनिरीक्षक यांना भीम आर्मीच्या वतीने लेखी तक्रार दिली व आरोपींविरोधात तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.
परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेता लाखनी पोलिस निरीक्षक यांनी पिडीत कुटुंबास त्रास देणाऱ्या लोकांना ठाण्यात बोलावून चांगलेच धारेवर धरले व पिडीत कुटुंबाला अभय दिले. भीम आर्मीने दिलेला मदतीचा हात अन्याय-अत्याचार विरोधात सदैव राहील असे विचार भीम आर्मीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रूपेश गोस्वामी यांनी व्यक्त केले.
लेखी तक्रार देतेवेळी भीम आर्मीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रूपेश गोस्वामी , भंडारा जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे भंडारा जिल्हा वाहतूक चालक मालक संघटना जिल्हाध्यक्ष अमीत गोस्वामी , उपाध्यक्ष सुयोग मेश्राम , भंडारा (ग्रामीण)
तालुकाध्यक्ष अश्वीन गोस्वामी , लाखनी तालुकाध्यक्ष रोशन खोब्रागडे , युवा तालुकाध्यक्ष अनमोल हूमने , त्रिरत्न गोस्वामी , प्रशीक बोरकर , तुषार लेंडारे , साहील लेंडारे , अनीता कांबळे , शालीनी गडपायले , श्रेयस रामटेके , शुभम बन्सोड इ. कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.