टीम सिटी टाइम्स भंडारा | संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी चंद्रयान ३ मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ने यशस्वी करून दाखवली. चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहचणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.
हेही वाचा | सिटी टाइम्स मराठी न्युज पोर्टल तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
चंद्रयान मोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचे नाव गौरवाने घेण्यात आले आहे. दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे चंद्रयान ३ सायंकाळी ६ वाजून ४ मिनीटाने चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहचले याचा जल्लोष सर्व भारतवासीयांनी केला आहे.
या जल्लोषाची सुरूवात महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातही करण्यात आलेली आहे. भारताच्या चंद्रयान-३ या मोहीमेत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या चमूत भंडारा शहरातील वैज्ञानिक सौरभ लंजे यांचेही महत्वपूर्ण योगदान आहे. ही बाब भंडारा जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद आहे.
हेही वाचा | जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण , दगडफेकीत ३८ पोलीस जखमी
भंडाराचे सुपुत्र सौरभ लंजे हे शहरातील सहकार नगर येथे वास्तव्यास राहतात. त्यांचे वडील यशवंत लंजे है रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक असून आई गीता लंजे गृहीणी आहेत. भंडारा शहरातील महीला समाज शाळेत दहावीपर्यंत व त्यानंतर लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात
बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर सौरभने सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजीनीयरींगमध्ये बी.टेक पूर्ण केले. त्यांनी आयआयटी गांधीनगर मधून एम.टेक पूर्ण केले व गेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर इस्त्रोमध्ये रूजू झाले. सौरभ लंजे हे सहा वर्षापासून इस्त्रोमध्ये सेवा देत आहेत. त्यांनी अभीयंता म्हणून इस्त्रोच्या मोहिमेत कामगीरी बजावलेली आहे.