सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | लाखनी येथील समर्थ महाविदयालय व पोलीस स्टेशन लाखनी च्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या मान्यवरांना भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
हेही वाचा | लाखनी पोलीस विभागातर्फे आयोजित आदर्श गाव मिशन व विदयार्थी मार्गदर्शन मेळावा
याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर हे सत्कार – समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विराजमान होते तर प्रमुख अतीथी म्हणून भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानी , अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे
सहाय्यक पोलिस अधिक्षक सुशांत सिंह , बागुल साहेब , पौनी , लाखनी पोलीस स्टेशनचे निरीक्षक मिलींद तायडे , डॉ.चंद्रकांत निंबार्ते , प्राचार्य दिगांबर कापसे व धनंजय गिर्हेपुंजे यांची विशेष उपस्थिती होती.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल लाखनी येथील प्रसिद्ध वैदयकीय तज्ञ डॉ. चंद्रकांत निंबार्ते , क्रांतीज्योती महीला संघटनेच्या अध्यक्षा अश्वीनी दिलीप भिवगडे , सामाजिक कार्यकर्ता दिनेश पंचबुद्धे ,
सुर्यकांत गभणे व सुनील भागवाणी इ. मान्यवरांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून यथोचित सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी समर्थ महाविदयालयाचे विदयार्थी , शिक्षकवृंद तसेच लाखनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थीत होते.
हेही वाचा | बोलेरो ट्रकला धडकली 1 गंभीर जखमी
हेही वाचा | निम्यापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त