Bail Pola | आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठया प्रमाणात यांत्रीकीकरण झाले असले तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे.
शेतीमध्ये चांगले पीक येण्यासाठी बैलांचे सुद्धा योगदान असते. त्यामुळे या बैलांची पूजा केली जाते. या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात.
हा सण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातही हा सण साजरा होतो. या सणाचे शेतकरी वर्गात विशेष महत्व आहे.
Bail Pola : बैल पोळा सणाला पोळा असे नाव का पडले
पौराणिक कथेनुसार प्रभु विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले होते. तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसाने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला.
हेही वाचा | चौथ्या मजल्यावरून पडून इसमाचा मृत्यू
तो दिवस श्रावण अमावस्येचा होता. तेव्हापासून या दिवसाला पोळा असे नाव पडले. या दिवसाला बालदिन असेही म्हणतात. या दिवशी मुलांवर विशेष प्रेम केले जाते.
महाराष्ट्रात या दिवसाला ” तान्हापोळा” म्हणतात. या दिवसाला लहान मुलांसाठी पोळ्याचे (तान्हा पोळा ) आयोजन केले जाते.
बैल पोळा सण : बैलपोळ्याविषयीची पौराणिक कथा
एकदा कैलासमध्ये शिव पार्वती सारीपाटाचा म्हणजेच चौरसाचा खेळ खेळीत होते. या खेळामध्ये माँ पार्वती विजयी झाली परंतु भगवान शिव मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले.
तेव्हा तिथे उपस्थित नंदीला पार्वतीने विचारले की या खेळामध्ये कोण जिंकला.
तेव्हा नंदीने शंकराचे नाव घेतले. त्यावर माँ पार्वती क्रोधीत झाली आणि नंदीला शाप दिला की, मृत्युलोकी (पृथ्वीवर) तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील.
तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. हे ऐकून नंदी घाबरला आणि त्याने आपली चूक मान्य केली.
त्याने माँ पार्वतीला क्षमा मागितली. त्यावर पार्वतीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करेल. त्या दिवशी तुझ्या
मानेवर नांगर राहणार नाही. तेव्हापासून याच कारणात्सव बैलपोळा हा सण साजरा करण्याची परंपरा पडली.
Bail Pola | बैलपोळा सण या वर्षी कधी आहे
बैलपोळा सण या वर्षी १४ सप्टेंबर गुरुवार रोजी साजरा करण्यात येईल. श्रावण अमावस्या गुरुवार १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी
सुरू होईल तर श्रावण अमावस्या समाप्ती शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी होईल.
पोळा सण कसा साजरा होतो
Bail Pola पोळा हा सण बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला हा सण शेतकरी वर्ग मोठया उत्साहाने
बैलांची पूजा करून साजरा करतात. बैलांना या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही.
शेतकरी बैलांना नदीवर , ओढ्यावर किंवा तलावात अथवा बोरवेलच्या पाण्याने स्वतःच्या हाताने आंघोळ घालीत असतो.
त्याच्या शिंगाना रंगीबेरंगी बेगड लावतात त्याचबरोबर बैलाच्या अंगावर ठिपके लावतात व त्यांच्या पाठीवर मस्तपैकी
झालर ठेवतात आणि बैलाला या दिवशी नवरदेवासारखे डोक्यावर बाशिंग बांधले जाते.
म्हणजे या दिवशी बळीराजा आपल्या बैलाला नवरदेव करतो. या दिवशी खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.
बैलाला भाताचे व पुरणपोळीचे नैवैद्य दिले जाते. बैलांना पोळ्याच्या मिरवणुकीत नेण्यात येते. तिथे
सर्वात सुंदर सजवलेल्या बैलाला व त्याच्या मालकास बक्षिसे दिलॆ जाते. त्यानंतर तोरण कापून बैलपोळा फोडला जातो.
नंतर शेतकरी त्यांना आमंत्रण देणाऱ्याच्या घरी घेऊन जातो. त्या घरी बैलाची पूजा केली जाते
आणि टोपलीमध्ये पत्रावळीत जेवण दिले जाते आणि बैलाच्या मालकास बोजारा दिला जातो.
या वेळेस ‘झडत्या’ म्हणजेच पोळा सणाची गीते म्हणायची पद्धत आहे. शेतकरी वर्गात हा सण
विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.
तान्हा पोळा सण कसा साजरा करतात
तान्हा पोळा हा खासकरून बालगोपालांसाठी असतो. या दिवशी लहान मुले आपल्या लाकडी बैलाला सजवत असतात.
त्या लाकडी बैलांची धावण्याची शर्यत भरवली जात असते जिंकणाऱ्या तान्ह्या बैलाला पारितोषिक दिले जाते.
त्याचबरोबर जो कोणी सर्वात सुंदर आपल्या लाकडी बैलाला सजवितो त्याला सुद्धा बक्षिस दिले जाते. काही ठिकाणी लहान मुले आपल्या लाकडी
बैलासोबत फिरत असतात. त्यांना मित्र परिवारातील लोक आपल्या घरी बोलावतात आणि त्यानां बोजारा देतात.
पोळा हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा अशा दोन प्रकारे साजरा केला जातो. मोठ्या पोळ्यामध्ये बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते तर लहान
पोळ्यामध्ये मुले खेळण्यातील बैल घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू दिली जाते.
या दिवशी घरात खास पदार्थ तयार केले जातात. या दिवशी पुरणपोळी, गुंज्या आणि पाच प्रकारच्या
भाज्या एकत्र करून मिक्स भाज्या तयार केल्या जातात.
या दिवशी अनेक ठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते. व्हॉलीबॉल, कुस्ती, कबड्डी, खो-खो इत्यादी
विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात व बक्षिसेही दिली जातात.