टीम सिटी टाइम्स भंडारा : राज्यात नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भीम आर्मी संघटन व आझाद समाज पार्टी विधानसभेच्या संपूर्ण २८८ जागांवरती निवडणूक लढविण्यास सज्ज झाले असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली असून, लवकरच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल यासंबधीचे स्पष्ट, संकेत भीम आर्मीचे माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बन्सोड यांनी दिले आहेत.
राज्याच्या राजकारणातील कांग्रेस व भाजप या प्रस्थापीत पक्षांची मक्तेदारी नष्ट करण्यासाठी ‘युपी का, लडाखू शेर व वंचिताचा हितेषी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपल्या सर्व ताकदीनीशी भीम आर्मी व आझाद समाज पार्टी विधासभा निवडणूक लढविणार आहे.
महाराष्ट्रातील जनतेला प्रस्थापीत पक्षांनी निव्वळ आश्वासने देऊन जनतेच्या भावनेशी खेळून त्यांचा विश्वासघात केला आहे. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला भाई चंद्रशेखर आझाद यांच्या रूपात आशेचा नवा किरण दिसत आहे जो महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवेल. असे वक्तव्य माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बन्सोड यांनी केले.