सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | भंडारा शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश केशवराव साठवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
प्राप्त माहीतीनुसार आयुष व अन्य तीन इसमांविरूद्ध भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहीता कलम ३०४ (अ) , २७९ , ३३७, ३३८ तसेच सहकलम १३४ , १८४ व १७७ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा | भारत देशात नवीन संवीधान लागू होणार ?
सदर गुन्ह्यातील आरोपी आयुष याला गुन्ह्यातून वगळण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आरोपीच्या वडीलास दहा हजार रूपयांची मागणी केली.
हेही वाचा | कारधा पूलावरील रहदारी नागरीकांचा जीव घेणार ?
आरोपीच्या वडीलाने यासंबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली व सदर तक्रारीवरून पडताळणी कारवाई दरम्यान राजेश साठवणे यांना तक्रारदाराकडून दहा हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले व गुन्हा नोंद करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी ही कार्यवाही केली आहे.
हेही वाचा | आत्महत्येची वेळ आलेल्या शेतकऱ्याचे कर्ज माफ
या कार्यवाही पथकामध्ये डॉ. अरूणकुमार लोहार , अमीत डहारे , संजय कुरूंजकर , मिथुन चांदेवार , अतुल मेश्राम , चेतन पोटे , मयुर सिंगनजुडे , विवेक रणदीवे , अभिलाषा गजभीये , अंकुश गाढवे , विष्णू वरठी इ. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व पोलीस शिपायांचा समावेश आहे.