टीम सिटी टाइम्स भंडारा | राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्यांमध्ये ७२ वसतिगृह सुरु करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने हिवाळी अधिवेशनात केल्याप्रमाणे राज्यातील जिल्हयात मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० विद्याधी क्षमतेचे दोन उसतिगृह सुरु करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने ओवीसी पाल्याण विभागाने पत्र काढून विद्याथ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशाकरिता ऑफलाईन अर्ज मागविले आहेत.
ओ.पी.सी., व्ही.जे.एन.टी व एसवीशी प्रवर्गातील विद्यार्थी हे या वसतिगृहात प्रवेशाकरिता अर्ज करु शकतात.
सदर प्रवेश अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे उपलब्ध असून विद्यार्थ्यांना ते विनामूल्य देण्यात येतील. अर्ज खालील अटी शर्तीचे अधिनतेवर देण्यात येतील.
१. मूळ भंडारा शहर येथील रहिवासी विद्यार्थ्याला वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज घेता येणार नाही.
२. विद्यार्थ्यांचे घय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
३. अर्ज घेतेवेळी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक मूळ / साक्षार्कित प्रत (मार्कशिट, टी.सी., जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र) घेऊन घेणे आवश्यक आहे.
४. विद्यार्थ्यांला इयत्ता १२ वी चे परिक्षेत ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
५. पालकाची उत्पन्न मर्यादा २.५ लाख असावी.
६. अर्जदार हा इमाय, विजाभज, विमाप्र, आर्थिक मागास प्रवर्गातील असावा.
७. अर्जदार हा व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रम घेणारा असावा.
वसतिगृहातील १०० जागांचे आरक्षण खालीलप्रमाणे
वसतिगृहनिहाय रिक्त जागांमध्ये इतर मागासवर्गाकरिता ५८ जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती ३१, विशेष मागास प्रवर्ग ०६, ई डब्ल्यु एस ४, दिव्यांग ४, अनाथ २ तर खास बाबीसाठी ५ अशा प्रत्येक वसतिगृहात १०० जागा राहणार आहेत.
विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, वरील १ ते ७ अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्याथ्यांनी अर्ज संपूर्ण कागदपत्रांच्या झेराक्स प्रतीसह सहाय्यक संचालक, इतर मागास पहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन भंडारा येथे सादर करावेत.