सिटी टाइम्स ऑनलाईन मुंबई | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे कार्यान्वित मुंबई – नागपूर द्रुतगती महामार्ग हा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो. आठ पदरी असलेला ७१० कि.मी लांबी असलेला हा महामार्ग पूर्णपणे ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे पैकी एक आहे.या महामार्गाचे उद्घाटन दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
हेही वाचा | लाखनी येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार समारंभ
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास १४ तासांवरून अवघ्या आठ तासांमध्ये पूर्ण केला जाईल. बारा जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाकांक्षी महामार्ग मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतुक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा ठरला आहे.
परंतु अलीकडे समृद्धी महामार्गावरती अपघातांचे प्रमाण खूप वाढलले आहे. अपघातांमध्ये अनेक लोकांनी आपले प्राणही गमावलेले आहेत. संमोहन महामार्ग , लेन कटींग , साईड डैश , टायर फुटणे , अतीवेग व मोबाईल वापरांमुळे सदर अपघात घडल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
अनेक हौसी तरूण हे समृद्धी महामार्गावरती व्हिडीओ रील्स काढून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. म्हणून समृद्धी महामार्गावर व्हिडीओ काढणारे तरूणांना पाचशे रूपयांच्या दंडासोबत एका महीन्याच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.