टीम सिटी टाइम्स भंडारा : मुंबई महानगरपालीकेने ऐन पावसाळ्यात पवई येथील जयभीमनगर झोपडपट्टीतील ७५० घरे उद्ध्वस्त केली. तेथील बौद्ध लोकांना बेघर केले. माता-भगींनींवरती पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यामध्ये एका महिलेचा गर्भपातही झाला.
जयभीम नगरातील झोपडपट्टीवासीय गेल्या ३० वर्षापासून तिथे वास्तव्य करीत आहेत. मुंबई महानगरपालीकेने बिल्डर हिराचंदानी याच्या घशात झोपडपट्टीची जागा घालण्यासाठी तेथील बौद्धजनांची घरे उद्ध्वस्त केली आहेत. त्यांच्यावरील झालेल्या अन्यायाविरोधात दि बुद्धीस्ट सोसायटी अॉफ इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी दोन दिवसांपासून पवई येथील बौद्धविहारासमोर उपोषण सुरू केले आहे.
त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ दि बुद्धीस्ट सोसायटी अॉफ इंडीया भंडारा , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व आंबेडकरी जनता या सर्वांनी मिळून दि. २० जून २०२४ ला जिल्हाधिकारी भंडारा यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात पिडीत कुटुंबांना न्याय देण्याची मागणी राज्य शासनाला करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी दि बुद्धिस्ट सोसायटी अॉफ इंडीया भंडारा जिल्हाध्यक्ष इंजी. रूपचंद रामटेके , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे भंडारा जिल्हाध्यक्ष अरूण गोंडाणे , कैलास गेडाम , मोरेश्वर गजभीये , नित्यानंद मेश्राम , अशोक मेश्राम , कालीदास खोब्रागडे , डॉ. युवराज मोटघरे , डॉ.प्रकाश कोटांगले , अजीत रंगारी , रोशन खोब्रागडे , अचल मेश्राम , विलास मेश्राम ,
कार्तिक तिरपुडे , विशाल मेश्राम , अरविंद धारगावे , नरेंद्र भोयर , भागवत मेश्राम , श्रीकांत नागदेवे , अंबादास नागदेवे , सत्यवान मेश्राम , रामरतन मेश्राम , छबीला नंदेश्वर , प्रमीला टेंभुरकर , रत्नमाला वैदय , संजीव भांबोरे , सुदेश वैदय , चंद्र शेखर खोब्रागडे , उषा मोटघरे , श्रीराम बोरकर व सदानंद धारगावे इ. बहुसंख्येने उपस्थित होते.