सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुर येथे अभिषेक कटकवार या तरुणाची जुन्या वादातून दगडाने ठेचून हत्या केली आहे. आठ दिवांपूर्वी मृतकाचे काही तरुणान सोबत सामान्य रुग्णालय परीसरात भांडण झाले होते.
हेही वाचा | लाखनी येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार समारंभ
याच भांडणातून ही हत्या झाल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. अभिषेक कटकवार वय वर्ष 25 रा. टप्पा मोहल्ला अशे मृतकाचे नाव आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गून्हा दाखल केला आहे.
हेही वाचा | सहा.पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटना स्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असुन भंडारा पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
हेही वाचा | सावधान : समृद्धी महामार्गावर व्हिडीओ रील्स बनवल्यास तुरूंगवास