सिटी टाइम्स ऑनलाईन लाखनी | ग्रामीण भागातील प्रतिभेला वाट मोकळी करून देण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे. ही प्रतिभा केवळ तालुकास्तरावर न राहता जिल्ह्याच्या पातळीवरही आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करता यावे यासाठी आम्ही तालुकास्तरातील विजय स्पर्धकांना लोकसभा स्तरावर संधी देणार आहोत. कलाकारांमधील आत्मविश्वास वाढून तो व्यक्त व्हावा या दृष्टीने हा आमचा प्रयत्न असल्याचे मत
खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाची औचित्य साधून लाखनी येथे तालुकास्तरीय युवा व महिला महोत्सव आज लाखनी येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात घेण्यात आला. यावेळी प्रचंड मोठ्या संख्येत उपस्थित युवा आणि महिला वर्गाला खासदार सुनील मेंढे संबोधित करीत होते.
स्पर्धेचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते झाले. कुठलीही स्पर्धा केवळ बक्षीस मिळविण्यासाठी, या नजरेने त्याकडे पाहू नका. तरी यातून स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक कलाकाराला मिळते.
लाखनीच्या महोत्सवात अलोट गर्दी
आज तालुकास्तरावर तुम्ही व्यक्त झालात. कदाचित काहींना बक्षीस मिळणार नाही मात्र प्रेक्षकांची मिळालेली दाद मौल्यवान असते असे सांगून अपयशाने खचून जाऊ नका असा सल्लाही यावेळी खासदारांनी दिला. विजेते स्पर्धक आणि संघानी लोकसभा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हा असेही यावेळी त्यांनी सांगितले.
या महोत्सवाला लाखनी तालुक्यातील युवा वयोगट 15 ते 25 व 26 वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिला गटाचे संघ सहभागी झाले होते. यावेळी शुभांगी मेंढे, माजी आमदार परिणय फुके, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे,
बाळा अंजनकर, शिवराम गिरीपुंजे, घनश्याम खेडीकर, राजेश बांते, धनंजय घाटबांधे , श्रावण कापगते , सत्यवान वंजारी, उमेश गायधने, गिरीश बावनकुळे, मनीष वंजारी देवेश नवखरे पंकज रामटेके, अश्विन धरमसारे, रजनी पडोळे, वनिता शेंडे उपस्थित होते.
यावेळी लोकनृत्य, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर नृत्य अशा विविध नृत्य प्रकारचा अविष्कार पाहायला मिळाला. पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम लाखनी येथे झाल्याने प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
लाखनी तालुक्यातील स्पर्धेचे नियोजन अभिषेक गिरेपुंजे, हेमंत गिरीपुंजे, दिगंबर कोसरे, मयुर निर्वाण यांनी केले. या स्पर्धेत परीक्षकांची जबाबदारी प्रा. संजय निंबेकर व स्वाती रामटेके यांनी पार पडली. उद्घाटन सत्राचे संचालन बाळा शिवणकर यांनी केले.