टीम सिटी टाइम्स लाखनी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने (दि.८ मार्च) शनिवारी ग्रामपंचायत आवारात विविध कार्यक्रमांनी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.स्त्री-शक्तीचा सन्मान करुन निरोगी आरोग्याचा संदेश देत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी सास्कृतिक कार्यक्रम,वृक्षरोपण, नृत्य,गीत गायन आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
ग्रामपंचायत गडेगावच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.माजी महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये,पंचायत समिती सदस्य मनीषा हलमारे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी भिवगडे, गडेगावच्या सरपंच वर्षा रेहपाडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने गावकरी महिला यावेळी उपस्थित होत्या.
गडेगाव येथे विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा
