टीम सिटी टाइम्स लाखनी | पैसाच्या वादातुन एका ४९वर्षीय इसमाला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे शुक्रवारी (दि.१) नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. राजकुमार रघुबीर शर्मा वय (४९) रा. गुंथारा असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी राजकुमार शर्मा यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांत चार आरोपीतांवर विविध कलमान्व्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, मनोज मेश्राम वय (३५) अंकल सार्वे वय (२५) बंडू मेश्राम वय (६०) अनमोल मेश्राम वय (३०) चारही रा. गुंथारा अशी आरोपीतांची नावे आहेत.
या घटनेतील फिर्यादी शुक्रवारी स्वतःच्या घरी असताना यातील चारही आरोपी फिर्यादीच्या घरापुढे संगणमत करून फिर्यादीस तुझे पैसे परत घे म्हणतं घराबाहेर बोलावले. दरम्यान, फिर्यादी घराबाहेर निघून आला असता,आरोपी मनोज मेश्राम याने काही न बोलता फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर वार केले.
तर इतर आरोपीतांनी लाथाबुक्यानी मारहान केली. व पैसे कसे मागतोस ते पाहून घेईन अशी धमकी दिली. या मारहाणीत राजकुमार शर्मा यांच्या उजव्या खंद्याला, डोळ्याला, तसेच छातीला दुखापत झाली.
याप्रकरणी, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या तोंडी आदेशानुसार व वैदकीय अहवालनुसार तसेच फिर्यादीच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांत कलम ११८ (१), ३५१(२), ३५२, ३ (५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस नायक राजेश बांते करीत आहेत.