टीम सिटी टाइम्स लाखनी : तालुक्यातील एका खासगी कंपनीत काम करण्याऱ्या 48 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना (दि 25) ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
महेंद्र अर्जुन बांबूर्डे वय (48) रा.शिवनगर मुरमाडी असे मृतक इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे, परिवारात शोकाकुळाचे वातावरण असून, मृतकाने राहत्या घरातील शय्यागृहमधील छतावरील पंख्याला पांढऱ्या रंगाच्या कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी रियानंद उरकुळाजी मेश्राम वय (55) रा. शिवनगर मुरमाडी यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस नायक पौर्णिमा कान्हेकर हे करीत आहेत.