टीम सिटी टाइम्स साकोली : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी दि.24 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात साकोली मतदारसंघातून एकूण 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले.
गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अर्ज काँग्रेसकडून तर, शेतकरीपुत्र अशी प्रचिती असणारे अपक्ष उमेदवार अशोक पटले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राज्यात निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, कार्यक्रमानुसार दि. 22 ते 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र, साकोली मतदारसंघात महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
कोणताही मोठा राजकीय पक्ष असाे, ते शेतकऱ्यांचे शत्रूच आहेत. त्यामुळे शेतकरी हीच एकमेव जात समजून शेतकरी, शेतकऱ्यांना बळ देणारा समर्थ राजकीय पर्याय म्हणून, अपक्ष अर्ज दाखल केल्याचे अशोक पटले यांनी यावेळी सांगितले.