सिटी टाइम्स ऑनलाईन | लाखनी येथील पोलिस ठाण्याचे हद्दीतील मुंडीपार/सडक येथे घरासमोरील अंगणात खुंटाला बांधलेल्या ६ म्हशीपैकी ३ म्हशी मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना मंगळवारी(ता.२२) पहाटे उघडकीस आली. १ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी घनश्याम लांडगे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
हेही वाचा | शाळेतील चार विदयार्थीनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक
धान शेती परवडेनासी झाल्याने अनेक शेतकरी पाळीव जनावरांचे पालन पोषण करून दुग्ध व्यवसायाकडे वळलेले आहेत. घनश्याम लांडगे(५२) मुंडीपार/सडक यांचेकडे ६ वेगवेगळ्या जातीच्या म्हशी व १ मुर्रा जातीचा हल्ल्या होता. दररोज सकाळी शेतीच्या आजूबाजूला व जंगल शिवारात ते स्वतः म्हशी चारण्यासाठी नेत असत.
हेही वाचा | लाखनी पोलीस विभागातर्फे आयोजित आदर्श गाव मिशन व विदयार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न
सोमवारी नेहमी प्रमाणे म्हशी चारायला नेऊन सायंकाळी घरी आणून घरासमोरील अंगणात खुंटाला बांधून चारापाणी केला. रात्री १०:०० वाजताच्या सुमारास जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री दरम्यान जाग आल्याने लघुशंकेसाठी उठले असता सर्व जनावरे बांधलेली दिसली.
त्यांना चारा टाकून पुन्हा झोपी गले. त्यानंतर पहाटे ४:०० वाजता दरम्यान झोपून उठलो व शेन उचलण्यासाठी म्हाशीकडे गेलो असता ३ म्हशी दिसून आल्या नाही. त्यांचा शोध घेतला. पण मिळून आल्या नाही.
हेही वाचा | AISF च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन
चोरी गेलेल्या ३ म्हशींची किंमत १ लाख २० हजार रुपये असून कोणीतरी अज्ञात चोराने सूना मोका पाहून चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३१७/२०२३ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत.