सिटी टाइम्स ऑनलाईन | मुंबई शहराच्या पूर्व उपनगरातील शाळेच्या आवारात सात वर्षांच्या चार विदयार्थीनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांनी मंगळवारी एका २३ वर्षीय शिक्षकाला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार पंधरा दिवसांपूर्वी तीन विदयार्थीनींचे लैंगिक शोषण झाले होते. परंतु शिक्षकाने पुन्हा एकदा मंगळवारला सात वर्षाच्या चौथ्या मुलीचा विनयभंग केल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे.
हेही वाचा | लाखनी पोलीस विभागातर्फे आयोजित आदर्श गाव मिशन व विदयार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न
प्राप्त माहीतीनुसार २३ वर्षीय आरोपी शिक्षक हा मुळचा औरंगाबादचा असून तो शाळेत पी.टी शिक्षक म्हणून कार्यरत होता. यापूर्वी त्याने ठाण्यातील एका खाजगी शाळेतही शिक्षक म्हणून एक वर्ष काम केले होते.
हेही वाचा | AISF च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन
सदर आरोपी हा शाळेच्या हॉलमध्ये शारीरिक प्रशिक्षण वर्ग घ्यायचा.व्याख्यानानंतर तो प्रत्येकाला त्यांच्या वर्गात जाण्यास सांगायचा. परंतु ज्या मुलींना त्याने आपल्या वासनेचे लक्ष्य केले होते त्यांना मागे राहण्यास सांगत होता.
हेही वाचा | जुन्या वैमनश्यातून दगडाने ठेचून व्हा चाकुचे वार करून युवकाचा निर्घृण खून
त्यानंतर आरोपी लक्ष्य केलेल्या विद्यार्थिनींना हॉलच्या कोपऱ्यात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा आणि नंतर त्यांना त्यांच्या वर्गात परत जाण्यास सांगायचा असे एका अधिकाऱ्याने नाव न लिहीण्याच्या अटीवर सांगीतले.
यापूर्वी या वासनांध शिक्षकाने इयत्ता तिसरीच्या तीन विदयार्थीनींवर वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार केला होता. परंतु मारहाणीच्या भितीपोटी विदयार्थीनींनी ही बाब आपल्या पालकांना सांगीतली नाही.
हेही वाचा | जिल्हा पोलिस अधीक्षकातर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
परंतु जेव्हा आरोपीने सोमवारी चौथ्या पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला तेव्हा त्या मुलीने ही बाब पालकांना सांगीतली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून इतर तीन मुलींना विश्वासात घेवून चौकशी केली असता हे दुष्कृत्य ऊघडकीस आले. पालकांनी शाळेला भेट देवून नराधम शिक्षकाला चांगलेच चोपले व स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी आरोपीला अटक करून या वासनांध शिक्षकाविरूद्ध भारतीय दंड संहीतानुसार विनयभंग व अनैसर्गिक कृत्य प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपासाचा शोध सुरू असून आज बुधवारला आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल. असे पोलीस सूत्रांनी सांगीतले.