सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | भंडारा येथील ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने ” अरोमीरा स्कुल ऑफ नर्सिंग ” या महाविद्यालयाने ANM नर्सिंग च्या विदयार्थीनींची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ दि. २४ आॉगस्ट २०२३ रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
प्राप्त माहीतीनुसार शहरातील रमाबाई आंबेडकर वॉर्डात असलेल्या ” अरोमीरा स्कूल ऑफ नर्सिंग” ने सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाइफरी (एएनएम) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थिनींना प्रवेश दिला होता. प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्क देखील वसूल केले.
हेही वाचा | जुन्या वैमनश्यातून दगडाने ठेचून व्हा चाकुचे वार करून युवकाचा निर्घृण खून
परंतु परिक्षेमध्ये अठरा विद्यार्थिनींची नोंदणीच केली नाही. शैक्षणिक सत्र संपेपर्यंत या विद्यार्थिनींना आता प्रथम वर्षाच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागत असून फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
शुक्रवारी भंडारा सर्किट हाऊस येथे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (एआयएसएफ) वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विद्यार्थिनींनी महाविद्यालय व्यवस्थापनावर कारवाई करावी व त्यांना दुसऱ्या नर्सिंग संस्थेतून समायोजन करून परीक्षेत प्रवेश द्यावा, अशी मागणी केली होती.
हेही वाचा | जिल्हा पोलिस अधीक्षकातर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
परंतु महाविदयालय प्रशासनातर्फे अदयापही कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. याचा निषेध म्हणून तसेच पिडीत विदयार्थीनींना न्याय मिळावा या हेतूने AISF तर्फे जिल्हाधिकारी कार्यालसमोर महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या महाविद्यालयात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये ANM कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना १४ ऑगस्ट रोजी कळले की, कॉलेजने त्यांची अजिबात नोंदणीच केली नाही.
तर शून्य उपस्थिती असलेल्या विद्यार्थिनींची नोंदणी करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे प्रशासक राकेश निखाडे, सहाय्यक जयश्री कडू आणि सचिव वर्षा अविनाश साखरे यांच्याकडे माहिती विचारली असता त्यांनी विद्यार्थिनींना पुढील सत्रात परीक्षा देण्याचे सुचवले.
हेही वाचा | लाखनी पोलीस विभागातर्फे आयोजित आदर्श गाव मिशन व विदयार्थी मार्गदर्शन मेळावा
हेही वाचा | बोलेरो ट्रकला धडकली 1 गंभीर जखमी
हेही वाचा | निम्यापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त