सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | लाखनी पोलीस विभाग व समर्थ महाविदयालय लाखनी च्या वतीने समर्थ महाविदयालयाच्या सभागृहात विदयार्थी मार्गदर्शन मेळावा व आदर्श गाव मिशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हेही वाचा | बोलेरो ट्रकला धडकली 1 गंभीर जखमी
याप्रसंगी भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी व डॉ. चंद्रकांत निंबार्ते हे प्रमुख अतिथी होते. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवीले होते.
विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोहीत मतानी म्हणाले की , विदयार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनावर विशेष भर दयावा तसेच त्यांनी सोशल मिडीया , मोबाईल व इंटरनेटपासून शक्यतो दुर राहून आपले जीवनाचे ध्येय साधण्यासाठी प्रयत्नरत असावे.
या कार्यक्रमाचे औचित्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये नेत्रतपासणी , दंतचिकीत्सा व आरोग्यतपासणी शिबीराचा बहुसंख्य लोकांनी लाभ घेतला.
हेही वाचा | निम्यापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त
पोलीस विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या आदर्श गाव मिशन च्या उपक्रमाचे अभिनंदन करून केसलवाडा (वाघ ) व मुरमाडी गावातील ग्रामस्थांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांना सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचे पाहुण्यांतर्फे सत्कार ही करण्यात आले.