सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | भंडारा शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नवनिर्मित वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास शासन प्रयत्नशील असले तरी क्रियानवयन यंत्रणेतील काही भ्रष्ट अभियंत्यांमुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नाही याचा प्रत्यय प्रभाग क्रमांक ४ गौतम बुद्ध नगर भंडारा येथे आला .
कंत्राटदार व शाखा अभियंत्याच्या संगनमताने साहित्याचा अत्यल्प वापर करून सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे
गौतम बुद्ध नगर प्रभाग क्रमांक ४ येथे नवीन वसाहती निर्माण झाल्या पण नगर परिषदेने पायाभूत सुविधांची निर्मिती केली नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहून जात असल्यामुळे नागरिकांना अकारण त्रास सहन करावा लागत असे.
प्रभाग वासियांच्या मागणीवरून नगरसेवक मनोज बोरकर यांचे प्रयत्नाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत गणेश वाडीभस्मे ते मनोज बोरकर यांचे घरापर्यंत ११ लाख ३७ हजार रुपये अंदाज पत्रकीय रकमेच्या सिमेंट काँक्रिट नाली बांधकामास नगर परिषद भंडारा कडून मंजुरी प्रदान करण्यात आली.
प्रभाग क्रमांक ४ भंडारा येथील प्रकार
ई – निविदा पद्धतीने बांधकामाचे कंत्राट आर्या कन्स्ट्रक्शन कंपनी तिरोडा यांना देण्यात आले. तांत्रिक मार्गदर्शन, सनियंत्रण व देखरेखीचे काम नगर परिषदेच्या अभियंता वंजारी मॅडम यांचेकडे सोपविण्यात आले होते.
हेही वाचा | लाखनी येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार समारंभ
करारनामा आर्या कन्स्ट्रक्शन कंपनी तिरोडा चे नावाने असला तरी टक्केवारीने सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम संजय माहुले या कंत्राटदारास देण्यात आले . कंत्रादाराने अभियंत्यासी संगनमत करून सिमेंट काँक्रिट नाली बांधकामात साहित्याचा अल्प प्रमाणात वापर केल्याने नाली बांधकाम निकृष्ट प्रतीचे झाले आहे. या नाली बांधकामाची गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून (क्वालिटी कंट्रोल) चौकशी झाल्यास सत्यता बाहेर येण्यास फार वेळ लागणार नाही .
हेही वाचा | जुण्या वादातून दगडाने ठेचून केली तरुणाची हत्या : गणेशपुर येथील घटना
मुख्याधिकारी व आर्या कन्स्ट्रक्शन मध्ये सेटिंग (चौकट)
नगर परिषद भंडारा मार्फत चालवील्या जाणाऱ्या दलीत वस्ती सुधार योजना, वैशिष्टपूर्ण , नागरी सुविधा , नगरोत्थान , १५ वा वित्त आयोग याशिवाय अनेक योजना चालविल्या जातात या सर्वच योजनांच्या विकास कामांचे कंत्राट आर्या कन्स्ट्रक्शन कंपनी तिरोडा यांना दिले जात असल्यामुळे मुख्याधिकाऱ्यासह सेटिंग असल्याच्या शहरात चर्चा होत आहेत .