टीम सिटी टाइम्स | मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार युद्धग्रस्त इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या काही भागात अडकलेल्या २७ भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
युद्धग्रस्त भागातील भारतीय नागरिकांना इजिप्तमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. या लोकांना त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी आता पुढील कारवाई केली जाईल.
१० नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू
इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीमुळे सुमारे १० नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमधील नेपाळ दूतावासाच्या अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा दिला आहे.
अमेरीकेची इस्त्रायलला आपात्कालीन मदत
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने शनिवारी अचानक केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील ६०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी इस्रायलच्या पलटवारात गाझा पट्टीत सुमारे ३५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
यादरम्यान अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनीही इस्रायलवरील हल्ले पाहता आठ अब्ज डॉलर्सची आपत्कालीन मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत ३०० ठार इस्रायलच्या पलटवारात गाझामध्ये २३० ठार