टीम सिटी टाइम्स लाखनी : अवैध रेती वाहतुकीवर आळा बसविण्यासाठी लाखनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार हृदयनारायण यादव यांनी पथके तयार करून अवैध रेती वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडल्याची घटना घडली. ही घटना (दि.२३) फेब्रुवारी रोजी सकाळी साडे ७ वाजताच्या सुमारास गुंथारा व शिवनी येथे घडली. या घटनेत लाखनी पोलीस स्टेशनच्या २ पथकांनी २ भिन्न ठिकाणी धाडी टाकून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर मधून अवैधरित्या रेती चोरी करणारे ट्रॅक्टर रंगेहात पकडले.
बादल हेमराज पंधरे वय (२४), व मालक. मुकेश वासुदेव टांगले वय (३६) दोन्ही रा. सुरेवाडा ता. जी. भंडारा अशी पहिल्या घटनेतील आरोपीची नावे असून, दुसऱ्या घटनेतील ट्रॅक्टर चालक सौरभ योगराज धार्मिक वय (२२) रा. गोंडेगाव व मालक अमोल बाळकृष्ण नागलवाडे वय (३६) रा. न्याहारवाणी अशी नावे आहेत.
या घटनेत लाखनी पोलिसांनी २ ट्रॅक्टर व २ ब्रॉस रेतीने भरलेल्या २ ट्रॉल्या असा एकूण १४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे व पोलीस हवालदार रामकृष्ण बावनकुळे करीत आहेत.
गुंथारा व शिवनी येथे रेती चोरी करणारे 2 ट्रॅक्टर पकडले
१४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : लाखनी पोलिसांची कारवाई
