टीम सिटी टाइम्स लाखनी : विषारी औषध प्राशन केल्याने एका 18 वार्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना (दी.17) ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोहरा येथे उघडकीस आली आहे. सुहानी रवींद्र इळपाते वय (18) रा. पोहरा असे मृतक तरुणीचे नांव आहे. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या, घटनेतील मृतक तरुणीने शेतावर ठेवलेली धानावर मारणारी विषारी औषध प्राशन केले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्राथमिक उपचाराकरीता नजीकच्या दवाखान्यात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वडिलांच्या फिर्यादीवरून तसेच वैदकीय अहवालावरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे हे करीत आहेत.