टीम सिटी टाइम्स लाखनी | पालांदूर किराणा सामान वाहतूक करत असलेला आयशर कंपनीचा मिनीडोर व हिरो पॅशन कंपनीची मोटर सायकल यांच्या अपघातात १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी(१७ एप्रिल) रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान पालांदुर-वाकल मार्गावर घडली.
लाखनी येथून पालांदुर मध्ये किराणा सामान सोडून उरलेला किराणा सामान घेऊन मिनीडोर क्र. एम.एच. ३१ एफ.सी.२०४९ चा चालक अनिल रामटेके(३५वर्ष) मु.रेंगेपार(कोठा) ता. लाखनी हा वाकल मार्गे तई-बारव्हाकडे जात होता व पौना ता.पौनी येथून गडपेंढरी येथे लग्नकार्याकरीता जात असलेल्या हीरो कंपनीची दुचाकी क्रमांक एम.एच.३६ टी.५७३१ चा चालक गंगाधर नामदेव पडोळे (५०वर्ष) मू.पौना ता.पवणी याने मिनीडोरला धडक दिली.
या अपघातात दुचाकी चालक गंगाधर नामदेव पडोळे हे ग्रामीण रुग्णालय पालांदुर येथे उपचारार्थ दाखल केले असता कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असल्याची माहिती आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी सुनंदा गंगाधर पडोळे (वय ५०वर्ष)जख्मी असून त्यांचेवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सूत्रांनी कळविलेआहे.
पालांदूर पोलिसांनी घटनास्थळ पंचानाम्याची ची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय,लाखनी येथे रवाना केले.घटनेची माहिती मिळताच पालांदुर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.वृत्त लिहिस्तोवर गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.